शालेय विद्यार्थ्यांकरीता ग्रामीण भागात बससेवा सुरळीत पोहचवा : कल्याणी भुरे


तुमसर : आजपासून संपूर्ण राज्यात शाळेची घंटा वाजत आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शालेय विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक गावात पोसचवून बससेवेचा लाभ द्यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा भाजपा महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी तुमसर-मोहाडी आगार प्रमुखांना निवेदनातून मागणी केली आहे.

Advertisement

शाळा, महाविद्यालय सुरु होत असल्याने विद्यार्थीनींना हात दाखविताच बस थांबविणे, शाळेच्या वेळेतच बस शाळेत पोहचविणे व महीला सुरक्षीतेच्या विचार लक्षात घेता ग्रामीण भागातील प्रत्येक गावापर्यंत बससेवा पुरवून सुखरुप प्रवासाला संहकार्य करावे, अशी मागणी भाजपा महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आगर प्रमुखांना निवेदनातून केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »