भरधाव ट्रकने महामार्ग पोलीस गाडीला उडविले; एक ठार, दोन गंभीर
गोंदिया: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील मासुलकसा घाट येथे ट्रक क्रमांक सी.जी.०८ए. के. १४०२ ने विरुध्द दिशेने येणाऱ्या महामार्ग पोलिस गाडी क्रमांक एम.एच.१२आर.टी. ९६२५ ला धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी होऊन, उपचाराकरिता नागपूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. मनीष बहेलिया असे मृतक पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर उर्वरित दोन पोलीस कर्मचाऱ्यावर चार सुरू आहेत. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, पोलीस गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंद होण्याच्या प्रक्रियेवर असून तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार महामार्ग पोलीस गाडी कोहमारा दिशेकडून देवरी दिशेकडे येत होती. तर ट्रक लोखंडी सळई घेऊन रायपुर कडून नागपूरकडे जात होता. मासूलकसा शिवारात अग्रवाल ग्लोबल कंपनीव्दारे मागील तीन ते चार वर्षापासून कासव गतीने उड्डाण पुलाचे काम सुरू असून महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात सदर अपघात घडला असावा अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये सुरू आहे. नुकताच पावसाळ्याला सुरुवात झाली असून, महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचा पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज लावता येत नाही. अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे सदर अपघात घडला असेल, अशी चर्चा परिसरातील नागरिकात सुरू आहे.
अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे, पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अशी चर्चा सध्या परिसरातील जनतेमध्ये रंगू लागलेली आहे. शासनाने महामार्ग क्रमांक ६ वरील मासूलकसा घाट येथे वन्यजीव संरक्षणाकरिता उड्डाण पुलाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आले असून, मागील तीन ते चार वर्षापासून उड्डाण पुलाचे काम कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या उड्डाण पूल परिसरातील महामार्गाला मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे, खड्डे चुकविण्याचा नादात आजपर्यंत कित्येक प्रवाशांचा अपघात झालेला आहे.
अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या मन मर्जी कारभाराने परिसरातील नागरिक तसेच प्रवासी त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केले आहे.
सदर अपघात खड्डे चुकविण्याच्या नादात झालेला असून, या अपघातामध्ये एका६ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या लापरवाहीमुळे होणारे अपघातावर कोण? आळा घालणार. असा प्रश्न परिसरातील नागरिक तसेच प्रवाशां समोर निर्माण झाला आहे.